या उन्हाळ्यात बनवा मार्केट सारखे थंडगार ताक! How to Make Buttermilk

0
masala taak

masala taak

ताक..तक्र..आरोग्यं धनसंपदा.. पृथ्वीवरील अमृताचे थेंब..
ताक … तक्र…buttermilk …पृथ्वीवरील अमृत …अतिशय पाचक, त्रिदोष नाशक असल्यामुळे अगदी प्राचीन काळापासून याचा आहारात सर्रास वपर केला जातो.

तर, ताक(buttermilk) म्हणजे काय? पारंपारिकपणे, लोणीमध्ये क्रीम ढवळून बाजूला केल्यानंतर उरलेले आंबवलेले द्रव म्हणजे ताक. आजकाल, स्टोअरमधून खरेदी केलेले ताक हे सामान्यतः लॅक्टिक बॅक्टेरिया असलेल्या दुधापासून तयार केले जाते, जे लॅक्टिक एसिड तयार करतात.

त्याचे नाव आणि दाटसर पना जे सूचित करते त्याउलट, ताक(buttermilk) हे लोणी(butter)  नसते आणि त्यात चरबीचे प्रमाण तुलनेने कमी असते.

buttermilk
buttermilk-masala-

घटक

 10 मिनिटे
 4 जणांना
  1. 4 कप दही
  2. 5 कप पाणी
  3. 2-3 हिरव्यामिरच्या
  4. 1 इंच आल्याचे तुकडे
  5. 1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
  6. 4-5 पुदिना पाने
  7. 1 टेबलस्पून भाजलेल्या जिर्याची पूड
  8. सैंधव मीठ चवीनुसार
  9. साखर चवीनुसार
  10. 1 टेबलस्पून चाट मसाला
masala-chaas-ingredients
masala-chaas-ingredients

प्रथम दह्यात पाणी घालून चांगले घुसळून ताक करून घ्यावे.

आता मठ्ठा करण्यासाठी वरील ताकातील निम्म्या ताकामध्ये साखर, सैंधव मीठ, जिरेपूड, कोथिंबीर,1-2पुदिना पाने बारीक चिरून,थोडे आल्याचे बारीक तुकडे किंवा किसून घाला..आणि व्यवस्थित घुसळून घ्यावे.वरुन पुदिना पाने, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

मसाला ताक करण्यासाठी 2-3हिरव्या मिरच्या, कोथिंबीर,आले,2-3 पुदिना पाने मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.‌

आता ही पेस्ट ताका मध्ये घालून मिश्रण एकजीव करा ‌‌…नंतर ताकात जिरेपूड, किंचीत साखर,सैंधव मीठ,थोडा चाट मसाला घालून ताक चांगले घुसळून घ्यावे.

वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा ‌.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *